Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»बेपत्ता असलेल्या जामनेरच्या तरुणाचा खून उघडकीस ; दोघे संशयित ताब्यात
    गुन्हे वार्ता

    बेपत्ता असलेल्या जामनेरच्या तरुणाचा खून उघडकीस ; दोघे संशयित ताब्यात

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 19, 2025Updated:December 19, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बेपत्ता असलेल्या जामनेरच्या तरुणाचा खून उघडकीस ; दोघे संशयित ताब्यात

    मैत्रीतून वैर; शिरसोली परिसरात गळा आवळून हत्या, मृतदेह धरणात टाकल्याची कबुली

    जळगाव (प्रतिनिधी) – जामनेर येथील चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा खून झाल्याचे धक्कादायक सत्य उघडकीस आले असून, मित्रांतील जुन्या वादातून ही निर्घृण हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. जळगाव तालुक्यातील शिरसोली परिसरात गळा दाबून हत्या करून मृतदेह पोत्यात बांधून नेव्हरे धरणात फेकून दिल्याची कबुली संशयितांनी दिल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

    जामनेर शहरातील दत्त चैतन्य नगर येथील रहिवासी निलेश राजेंद्र कासार (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. निलेश हा आई-वडील व बहिणीसोबत जामनेर येथे वास्तव्यास होता. सोमवार दि. १५ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेपासून तो बेपत्ता झाल्याची तक्रार जामनेर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. दरम्यान, निलेश हा जळगाव शहरातील एलटीआय फायनान्स कंपनीत कार्यरत असल्याचे तपासात समोर आले.

    याच कंपनीत काम करणारे दिनेश चौधरी (वय २०, रा. तळई, ता. एरंडोल) व भूषण बाळू पाटील (वय २०, रा. पिंपरी, ता. चोपडा) हे दोघेही सध्या जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे मामाकडे राहत होते. कामाच्या ठिकाणी या तिघांमध्ये मैत्री झाली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून निलेश व भूषण यांच्यात वाद झाला होता. त्या भांडणाची मनात खुन्नस ठेवून भूषण पाटील संधीच्या शोधात होता.

    दरम्यान, फायनान्सशी संबंधित एका प्रकरणाच्या निमित्ताने भूषणने दिनेशच्या माध्यमातून निलेशला शिरसोली येथे बोलावले. प्रकरणावर चर्चा करत असताना वाद विकोपाला गेला आणि शिरसोली गावालगतच्या एका शेतात भूषण पाटील व दिनेश चौधरी यांनी निलेश कासार याचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह पोत्यात बांधून नेव्हरे धरणात फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.

    निलेश बेपत्ता असल्याने पोलिस व नातेवाईकांकडून शोधमोहीम सुरू होती. दरम्यान रामदेववाडी गावालगत निलेशची दुचाकी आढळून आली. यामुळे संशय बळावला. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मोबाईल कॉल डिटेल्स व तांत्रिक तपास सुरू केला. चौकशीत संशयित दिनेश व भूषण यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिली.

    शुक्रवार दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी नेव्हरे धरणातून निलेश कासार याचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णालयात निलेशच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

    #crime #Jamner Police Station #shirsoli Jamner murder MIDC Police Station
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif