Wednesday, August 10, 2022

३५ वर्षीय तरूणाचा खून; गुन्हा दाखल

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जामनेर तालुक्यातील गारखेडा खुर्द येथील शिवारात ३५ वर्षीय तरूणाचा खून केल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील गंगापूरी येथील श्याम फकीरा ठाकरे (वय ३५) हा आपल्या पत्नी विद्या यांच्यासह राहायचं. शेतीचे काम करून उदरनिर्वाह करत होते. २४ जून रोजी सकाळी ८ वाजता ते घरातून बाहेर पडले होते. अज्ञात व्यक्तीने त्यांचा खून केल्याचे २५ जून रोजी निष्पन्न झाले. खून करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान विद्या ठाकरे यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या