Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»मुलगा हवाच या विकृतीतून नवजात चिमुरडीची हत्या!
    गुन्हे वार्ता

    मुलगा हवाच या विकृतीतून नवजात चिमुरडीची हत्या!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 26, 2025Updated:December 26, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुलगा हवाच या विकृतीतून नवजात चिमुरडीची हत्या!

    जामनेर तालुक्यातील मोराड येथील घटना ; विकृत बापाला बेड्या 

    जामनेर (प्रतिनिधी) : मुलाच्या हव्यासापोटी माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील मोराड येथे घडली असून, चौथ्यांदाही मुलगीच जन्माला आल्याच्या रागातून एका विकृत पित्याने आपल्या अवघ्या तीन दिवसांच्या चिमुरडीची निर्घृण हत्या केल्याची संताप जनक घटना समोर आली असून या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या अमानवी कृत्यामुळे समाजातील मुला–मुलींच्या भेदाची दाहकता पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली आहे.

    कृष्णा लालचंद राठोड (वय २६, रा. मोराड) असे आरोपी पित्याचे नाव असून त्याला यापूर्वी तीन मुली आहेत. चौथ्यांदा मुलगा होईल, या अपेक्षेने तो वाट पाहत होता; मात्र १३ नोव्हेंबर रोजी त्याच्या पत्नीने पुन्हा एका मुलीला जन्म दिला. मुलगा न झाल्याच्या रागातूनच २५ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता राठोड याने घरात असलेल्या लाकडी पाटाने तीन दिवसांच्या ‘राधिका’ नावाच्या बालिकेच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या गंभीर हल्ल्यात चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला.
    घटनेची माहिती मिळताच पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार बाळकृष्ण शिंब्रे यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तत्काळ हालचाली करत आरोपी कृष्णा राठोड यास त्याच रात्री ८.५१ वाजता अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहेत.

    एका पित्यानेच आपल्या पोटच्या गोळ्याची अशा प्रकारे हत्या केल्याने संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत असून, मुलगा–मुलगी भेद नष्ट करण्यासाठी समाजस्तरावर कठोर पावले उचलण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime #murder Jamner
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला

    November 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif