माजी सरपंचावर रोखले पिस्तूल; निवडणुकीचा वाद विकोपाला

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

जामनेर तालुक्यातील हिंगणे बुद्रुक येथे निवडणुकीचा वाद विकोपाला गेला. गावातीलच एका व्यक्तीने माजी सरपंचाच्या छातीवर बंदूक लावत तुला शूट करुन टाकतो, मग पहा तुझ्या पॅनलचे काय होते?, अशी धमकी दिली. याप्रकरणी ज्ञानेश्वर उर्फ नाना पंडीत गोसावी, तुषार संजय गोसावी (दोघे रा. हिंगणे ता. जामनेर) यांच्या विरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागरिकांची गर्दी होताच काढला पळ

13 डिसेंबर मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास हिंगणे बुद्रुक येथील माजी सरपंच अनिल चौधरी हे गावात असताना ज्ञानेश्वर उर्फ नाना पंडीत गोसावी याने त्यांचे छातीला बंदूक लावून धमकी दिली. तर त्याच्यासोबत असलेला तुषार संजय गोसावी याने कॉलर पकडून बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी नागरिकांनी गर्दी केल्याने दोघांनी पळ काढला.

तु मेल्यावर तुझ्या..

माजी सरपंच अनिल चौधरी यांचा नर्सरी आणि शेतीचा व्यवसाय आहे. 13 डिसेंबरच्या सायंकाळी ज्ञानेश्वर आणि तुषार या दोघांनी अनिल चौधरी यांना पाच हजार रुपयांची मागणी केली. यावर अनिल चौधरी यांनी आपल्याजवळ आज पैसे नसून काम असल्यास उद्या देतो असे म्हटले. अनिल चौधरी यांच्या बोलण्याचा राग आल्यामुळे ज्ञानेश्वर गोसावी याने अनिल चौधरी यांच्या छातीवर पिस्तुल रोखून तुला आज रात्री आठ वाजेपर्यंत जीवंत ठेवणार ठेवणार नाही अशी धमकी दिली. तु मेल्यावर तुझ्या निवडणूक पॅनलचे काय होईल ते मी पाहून घेईन अशी देखील धमकी दिली.

गुन्हा दाखल

दरम्यान अनिल चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ज्ञानेश्वर गोसावी व तुषार गोसावी यांचे विरुध्द भादंवि कलम 307, 323 शस्त्र कायदा 3/25, 34 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक दिपक मोहीते तपास करीत आहे. संशयिताला तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी जामनेर पोलिस ठाणे आवारात ठिय्या आंदोलन केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.