जामनेर, लोकशाही न्युज नेटवर्क
शहरातील वाकी रोडवर सिमेंट मिक्सर वाहनाखाली तरुण आल्याने गंभीरपणे जखमी झाल्याची घटना घडली आहे.
शहरातील वाकी रोड वरील माऊली प्रोव्हिजन समोर दुपारी तीन वाजेच्या सुमारास सिमेंट मिक्सर वाहन हे शहरातुन वाकीकडे जात असतांना हरहुन्नरी पथनाट्य कलाकार संतोष सराफ हे दुचाकीवरून घरी जात होते. अचानक यांच्या अंगावरुन हे वाहन गेले, त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना जळगाव येथे पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
वाकी रोड सदर अपघातांच्या घटनेने सध्य परीस्थितीत प्रसिद्ध झाले आहे. वर्दळ वाढल्याने मागील काही वर्षांपासून नेहमी अपघात घडतात. याचे मुख्य कारण वाढलेले अतिक्रमण व रस्त्यावर वाहन धारकांनी लावलेल्या मधोमध वाहनांमुळे हे अपघात होत असतात. त्यामुळे निष्पाप नागरीकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागतो किंवा वेळेस आपला जीव गमवावा लागतो.
तसेच याच रोडवर सेंट्रल बँक व पोस्ट ऑफीस असल्याने बेशिस्त वाहन धारक मनमानी पद्धतीने वाहने लावतात. यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागते. यामुळे पुन्हा नागरीकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.