इलेक्ट्रिक शॉक लागून महिलेचा मृत्यू

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील शेंगोळा येथील २७ वर्षीय महिलेचा इलेक्ट्रीक शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अचानक घडलेल्या या घटनेने गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत पहूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सपना श्याम जोशी (वय २७) असे मयत महिलेचे नाव असून त्या शेंगोळा येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होत्या. काल बुधवार रोजी त्यांना इलेक्ट्रीक शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शव विच्छेदन करण्यात आले. पुढील तपास किरण शिंपी करीत आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.