जामनेर तालुक्यात १०८ महिलांवर लेप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया
शासकीय शिबिरातून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वी : तालुक्याच्या ठिकाणी सुविधा : नागरिकांमध्ये समाधान
जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुक्यात विविध ठिकाणी प्रख्यात सर्जन डॉ. अशोक बेलखोडे यांच्या टीम कडून १०८ लेप्रोस्कोपीक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. उपजिल्हा रुग्णालय जामनेर, ग्रामीण रुग्णालय पहूर, प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदुर्णी, प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडीसह शिबिर संपन्न झाले.
लेप्रोस्कोपीक सर्जरीसाठी खाजगी रुग्णालयात २५ ते ३० हजार रुपये खर्च येत असतो. ज्या महिलांचे नियमित कुटुंब नियोजन कॅम्प मध्ये ऑपरेशन होऊ शकत नाही अशा महिलांसाठी लेप्रोस्कोपीक कॅम्पचे आयोजन करण्यात येत असते. सदर लेप्रोस्कोपीक ऑपरेशनसाठी जिल्ह्याला जाण्याची गरज भासते पण सदर सुविधा प्रशासनाने तालुक्यात उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांकडून आनंद व्यक्त करण्यात आला.
शिबिर नियोजनासाठी जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. रमेश धापते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनय सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, डॉ. पल्लवी राऊत, डॉ. प्रशांत महाजन, डॉ. राहुल निकम, डॉ. संदीप पाटील, डॉ. मोहित जोहरे, डॉ. दानिश खान, डॉ. हर्षल भटकर, डॉ. कोमल देसले, डॉ. शारिक काद्री, डॉ. सागर पाटील ग्रामीण रुग्णालय पहूर, उपजिल्हा रुग्णालय जामनेर व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्टाफ व आशा स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.