जामनेरात रंगणार नमो कुस्तीचा महाकुंभ

कुस्तीला प्रोत्साहन देणे हेच दंगलीचे उद्दिष्ट - ना. गिरीष महाजन

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

खास कुस्तीगीर व कुस्ती प्रेमींना आनंदाची बातमी तसेच “देवाभाऊ केसरी” व नमो कुस्ती महाकुंभाच्या माध्यमातून जामनेर तालुक्याच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा रोवला जाणार  आहे.

शहरातील हिवरखेडा रोडवरील भव्य पटांगणावर येत्या १६ फेब्रुवारी रोजी ऐतिहासिक असा आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तींची भव्य दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर आयोजित केलेल्या कुस्ती दंगलीत हिंदुस्थानातील तसेच फ्रान्स, माल्दोवा, उझबेकिस्थान, रोमानिया, आणि एस्टोनिया या देशातील जागतिक पातळीवर वरील विजेते ऑलिंपियन, हिंद केसरी, रूस्तुम- ऐ – हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी यांसारख्या मल्लांसह प्रसिद्ध महिला कुस्तीगीर आपल्या कुस्तीची कमाल दाखविणार आहेत. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या निवासस्थानी ना. गिरीष महाजन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.