Tuesday, November 29, 2022

धक्कादायक……अल्पवयीन तरुणीला ब्लॅकमेलिंग करत दोन नराधमांचा अत्याचार

- Advertisement -

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

अल्पवयीन तरुणीला आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर दोघांनी नराधमांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी त्या दोन नराधमांसह त्यांना मदत करणाऱ्या इतर दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर शहरात वास्तव्याला असणाऱ्या आणि घरकाम करणाऱ्या १७ वर्षांच्या तरुणीला तालुक्यातील तोरनाळा येथील आकाश सुरेश मुरळकर याने २ एप्रिल रोजी धमकावून बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित केले. याप्रसंगी व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. यानंतर आकाशचा मित्र तुषार सोन्नी ( रा. चिंचोली पिंप्री, ता. जामनेर ) याने १२ जून २०२२ रोजी बुलढाणा येथील एका कॅफेमध्ये अत्याचार केले. याप्रसंगी देखील व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.

सदर तरुणीने ही बाब आपल्या पालकांना सांगितल्यानंतर या प्रकरणी आकाश सुरेश मुरळकर (रा. तोरनाळा) आणि तुषार सोन्नी ( रा. चिंचोली पिंप्री, ता. जामनेर) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात त्यांना अजून दोघांनी मदत केली. यात एका तरूणीचाही समावेश असल्याची धक्कादायक बाब आहे. त्या तरुणीसह जामनेर येथील रहिवासी योगेश लोणारी याच्या विरुध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या चारही जणांच्या विरुध्द भाग ५, गुरन २९९ / २०२२ भादंवि कलम ३७६ (२) (जे) (एन); ५०६, ३४ सह पोक्सो कायद्याचे कलम ५ आणि ६ तसेच अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम ३ (१) (आर) ३ (१) (एस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या