जामनेरात संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजना केंद्र स्थापन

0

जामनेर,  लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी.द्वारे लाभार्थ्यांचे थेट खात्यात जमा करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या असुन डि. बि. टी. पोर्टलवर आधार कार्ड वॅलिडेट तसेच आधार वॅलिडेट न झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर २०२४ व जानेवारी २०२५ चे अर्थसहाय्य डि. बि. टी. पोर्टल मार्फत देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पोर्टलवर लाभार्थ्यांची नोंदणी न केलेल्या लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य माहे फेब्रुवारी २०२५ पासून बंद करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील नेरी दि. १६/१/२०२५ शेंदुर्णी २०/१/२०२५ पहुर २१/१/२०२५ फत्तेपुर २२/१/२०२५ देऊळगांव २३/१/२०२५ नाचणखेडा पाळधी २४/१/२०२५ तोंडापुर २७/१/२५ जामनेर २८/१/२५ या दरम्यान केंद्र उभारण्यात आले आहेत.

तरी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डी.बी.टी. द्वारे करण्याबाबचत निर्देश दिलेले आहे. सदर योजनेतील सर्व लाभार्थ्यांची खाती आधार सलग्न असणे आवश्यक आहे. सदरचे कामकाज हे तातडीने पूर्ण करणे बाबत निर्देश देण्यात आलेले असुन या करिता संगायो व श्रावणबाळ याजनेतील बँक पासबुक/आधार कार्ड / लाभार्थ्यांची जन्म तारीख वय त्यांचा जातीचा संवर्ग तसेच त्यांचा मोबाईल क्रमांक तसचे लाभार्थ्यांचे दिव्यांग असल्यास त्यांचे प्रमाणपत्र व किती टक्के अपंग आहे. त्यांचे उत्पन्न किती आहे. याबाबत लाभार्थ्यांचे माहिती सादर करावयाची आहे. माहे जानेवारी 2025 अखेर पावेतो सदर लाभार्थ्यांची माहिती ऑनलाईन भरावयाची आहे.जामनेर तालुक्यातील एकूण १३००० लाभार्थ्यांना पैकी अद्याप ६००० लाभार्थी यांची वरील नमूद माहिती अप्राप्त असल्याने जामनेर तालुक्यातील खालील गावांमध्ये लाभार्थी माहिती गोळा करणे कामी खालील प्रमाणे कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे.सदर दिवशी संबंधित ग्राममहसूल अधिकारी,महसूल सेवक व मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी तसेच संजय गांधी योजना शाखा अधिकारी व कर्मचारी देखील कॅम्प ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.

तरी नमूद गावाचे लाभार्थी यांनी कॅम्प ठिकाणी उपस्थित राहून आवश्यक माहिती तातडीने आपले गावचे तलाठी यांचेकडे न चुकता जमा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.