जामनेर ,लोकशाही न्युज नेटवर्क
जामनेर नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छतोत्सव २०२३ च्या निमित्ताने फेरीचे आयोजन करण्यात आले होते. याला
जामनेर शहरातील नागरिकांसह महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन स्वच्छतोत्सव २०२३च्या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला.
तत्पूर्वी जामनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी उपस्थित नागरिकांना तसेच महिलांना आपल्या घरात कचरा असेल तर तो आपण स्वतः झाडु घेऊन स्वच्छ करुन घेतला पाहिजे . तसेच प्लॅस्टिक कचरा याचे विघटन लवकर होत नसल्याने शक्यतोवर प्लॅस्टिकचा वापर टाळावा. सार्वजनिक ठिकाणी न थुंकता व स्व:त घाण न करता इतरांना, याबाबतीत पटवून घाण करण्या पासून रोखणे, परीसरात इतरत्र कचरा न टाकता कचरापेटी टाकावा, किंवा कचर्याची कुंडी ठेवून त्यातच कचरा टाकुन तुम्ही त्याची अंमलबजावणी सामाजिक स्तरावर देखील करु शकतात. स्वच्छ्ता हासुद्धा एक दागिना असुन “हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे” हि म्हण नेहमी म्हटल्या जाते ती खरी आहे. त्याच प्रमाणे परीसरातील स्वच्छता करणे म्हणजे सर्व पर्यावरण घटकांची स्वच्छता करण्यासारखे आहे. नदी, नाले, डोंगर जमीन, हवा, प्रदुषित न होवू देणे स्वच्छतेचेच काम आहे.
राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी सर्वात आधी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. स्वच्छता हा निरोगी आरोग्याचा पाया असुन आपला परीसर स्वच्छ परीसर हि मोहिम सतत राबविली पाहिजे. स्वच्छतेच्या नियमांचे पालन करु घर अंगण स्वच्छ ठेऊ,स्वच्छ सुंदर परीसर जीवन निरोगी निरंतर, रंग भगवा त्यागाचा मार्ग स्विकारु स्वच्छतेचा, जर स्वच्छता नसेल तर प्रदुषण तसेच साथीचे रोग अशा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात व आपल्याला त्यांना सामोरे जावे लागते. आज स्वच्छतेची जाणीव नसल्याने गंभीर परीस्थिती निर्माण होऊन आरोग्यास धोका होऊ शकतो.
आता उन्हाळा सुरू झाला आहे बाहेर निघतांना काळजी घ्यावी. भरपूर पाणी प्यावे व पाणी गरम करून गाळून घ्यावे. असे अनमोल मार्गदर्शन दिले . शहरातील तमाम माता भगिनींना ओला व सुका कचरा वेगळा करण्याची विनंती केली. या स्वच्छता मोहिमेत शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन त्याचे रुपांतर फेरीत करुन शहराच्या विविध भागात स्वच्छता मशाल यात्रा काढण्यात आली. या मशाल यात्रेला नागरिकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, आरोग्य विभाग प्रमुख सुरज पाटील, राहुल पाटील, पथनाट्य कलाकार आयु. संतोष सराफ, खलिल देशमुख, गजानन माळी, यांच्या सह न. प. अधिकारी कर्मचारी या स्वच्छता मशाल यात्रेत सहभागी झाले होते.