Sunday, November 27, 2022

धक्कादायक.. पोलीस महासंचालकांची गळा चिरून हत्या

- Advertisement -

जम्मू काश्मीर, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

काल रात्री जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) तुरुंग विभागाच्या पोलीस महासंचालकांची (DG Prisons) गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. यामुळे आता तिथल्या सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. या हत्येच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत, त्यामुळे सुरक्षा यंत्रणा आता अधिक सतर्क झाल्या आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

पोलीस महासंचालक हेमंत लोहिया (DIG Hemant Lohiya) यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांना त्यांच्या मदतनीसावर संशय आहे. कारण या घटनेनंतर तो फरार झाला आहे. लोहिया यांचा मृतदेह त्यांच्या शहराबाहेरच्या घरामध्ये आढळून आला आहे. त्यांच्या शरीरावर चाकूने वार केल्याचं पोलिसांना आढळून आलं आहे. लोहिया यांना ऑगस्ट महिन्यात पोलीस महासंचालक (तुरुंग प्रशासन) ही जबाबदारी देण्यात आली होती.

नेमकं प्रकरण काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, लोहिया यांच्या शरीरावर चाकूने वार करण्यात आल्याचं आढळून आलं आहे. लोहिया यांच्या पायाला तेल लावल्याचंही आढळून आलं आहे. त्यांचा पाय सुजला होता. आरोपीने लोहिया यांना गुदमरून मारलं, त्यानंतर सॉसच्या बाटलीच्या काचेने त्यांचा गळा चिरला आणि मग त्यांचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या