Tuesday, May 24, 2022

जामनेरसह तालुक्यात सुरू असलेल्या गुटखा विक्रीबाबत शिवसेना आक्रमक

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

जामनेर शहरासह तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर अवैध प्रकारच्या गुटखा, सुगंधी सुपारी विक्री बाबत शिवसेने आक्रमक पवित्रा उचलला आहे. शिवसेनेच्या वतीने जामनेर पोलीस स्टेशनला पोनि. किरण शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

- Advertisement -

सदर निवेदनात नमूद केले आहे की, राज्यात गुटखा किंवा सुगंधी सुपारी यांवर बंदी घालण्यात आली. परंतु शहरासह ग्रामीण भागात गुटखा विक्री व्यवसाय प्रचंड बोकाळला असुन गल्ली बोळात, सार्वजनिक ठिकाणी तसेच शाळा, रूग्णालय परिसरात विक्री होत असल्याने या धंद्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. लहान मुले व्यसनाधीन झाले आहे. कित्येकांनी आपले आयुष्य या व्यसनापायी गमावले आहे. अनेकांच्या घरासह संसाराची राखरांगोळी झाली आहे.

अशा गुटखा विक्री व्यवसाय करणाऱ्यांवर येत्या आठ दिवसात कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा गुटख्याची प्रेत यात्रा काढण्यात येणार येईल. असा तीव्र इशारा देण्यात आला.

निवेदन देते वेळी शहराध्यक्ष अतुल सोनवणे, माजी युवा सेना उपजिल्हाध्यक्ष अॅड. भरत पवार, उप. जिल्हा संघटक सुधाकर शेठ सराफ, शहर प्रमुख कैलास माळी, उपशहर प्रमुख दिपक माळी, शहर संघटक महेंद्र बिऱ्हाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या