बापरे.. महाराष्ट्रात सापडलं 390 कोटींचं घबाड; 58 कोटी रोख, 32 किलो सोनं

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जालन्यामधून (Jalna) आयकर विभागाच्या (Income Tax Raid) एका मोठ्या कारवाईबद्दल माहिती समोर आलीये. आयकर विभागाने जालन्यातील एका उद्योजकांच्या विविध मालमत्तांवर धाडी टाकल्या. 1 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान आयकर विभागाच्या पथकांनी छापेमारी केली. यात तब्बल 58 कोटी रुपये रोख रक्कम. 32 किलो सोनं, हिरे-मोती आणि इतर संपत्तीची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

जालन्यातल्या एका स्टील, कपडे आणि बांधकाम व्यावसायिक असलेल्या उद्योजकाच्या विविध मालमत्तांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या. यात मोठ्या प्रमाणात संपत्ती आढळून आली आहे.

आयकर विभागाने उद्योजकांची तब्बल 390 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. यात 58 कोटी रुपये रोख स्वरूपात आहे. छापेमारीत आयकर विभागाला मोठ्या प्रमाणात रोख रक्कम मिळाली. ही रक्कम मोजण्यासाठी आयकरच्या अधिकाऱ्यांना तब्बल 13 तास लागले. आयकर विभागाने 1 ते 8 ऑगस्ट दरम्यान ही कारवाई केलीये.

मिळालेल्या माहितीनुसार 1 ते 8 ऑगस्ट या कालावधीत आयकर विभागाच्या नाशिक शाखेनं ही कारवाई केली आहे. राज्यभरातील 260 अधिकारी-कर्मचारी या छापेमारी कारवाईत सहभागी झाले होते. आयकर विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची पाच पथके तयार करण्यात आली होती. छापेमारी करण्यासाठी तब्बल 120 पेक्षा अधिक गाड्यांचा वापर करण्यात आला.

 का केली कारवाई?

स्टील, कपडे आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक असलेल्या या उद्योजकाकडे सापडलेली रोख रक्कम आयकर विभागाच्या पथकाने ताब्यात घेतली. त्यानंतर जालन्यातील स्थानिक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयात नेण्यात आली. तिथे ही रक्कम मोजण्यात आली.

सकाळी 11 वाजता पैसे मोजण्याचं काम सुरू झालं होतं. मध्यरात्री जवळपास एक वाजेपर्यंत पैसे मोजण्याचं काम सुरू होतं. आयकर विभागाला अशी माहिती मिळाली होती की, जालन्यातल्या सटी कंपनीच्या व्यवहारात अनियमितता आहे.

फार्महाऊसवर लपवली संपत्ती

ही गोपनीय माहिती मिळाल्यानंतर आयकर विभागाने कारवाई केली. आयकर विभागाच्या पथकांनी उद्योजकाच्या घरी आणि कारखान्यांवर धाडी टाकल्या. या छापेमारीत आयकरच्या पथकांना घरात काहीही आढळून आलं नाही. शहराबाहेर असलेल्या फार्म हाऊसवर रोख रक्कम, सोनं, हिरे-मोती यासह संपत्तीसंबंधीत कागदपत्रं आढळून आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here