नूतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्याची आत्महत्या; प्रेमभंगातून टोकाचे पाऊल

0

जळगाव | प्रतिनिधी जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने प्रेमभंगातून नैराश्यात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (रविवार, २७ एप्रिल) सकाळी ८ वाजता उघडकीस आली. मृत विद्यार्थ्याचे नाव सत्तू कोळी असून, त्याचे संपूर्ण नाव अद्याप समोर आलेले नाही.

आत्महत्या करण्यापूर्वी सत्तूने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्टेटस पोस्ट करत आपले भावनिक मनोव्यथाजनक विचार व्यक्त केले होते. सकाळी इतर विद्यार्थ्यांच्या लक्षात ही घटना येताच महाविद्यालय प्रशासन आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविला.

या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येत आहे. दरम्यान, मृत विद्यार्थ्याची संपूर्ण ओळख पटविण्यासाठी जिल्हा पेठ पोलिसांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.