Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जुनी वाहने ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’शिवाय रस्त्यावर!; जळगावात कारवाईला बगल, फॅन्सी नंबर प्लेटचेही साम्राज्य
    उत्तर महाराष्ट्र

    जुनी वाहने ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’शिवाय रस्त्यावर!; जळगावात कारवाईला बगल, फॅन्सी नंबर प्लेटचेही साम्राज्य

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 26, 2025Updated:November 26, 2025No Comments5 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जुनी वाहने ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’शिवाय रस्त्यावर!; जळगावात कारवाईला बगल, फॅन्सी नंबर प्लेटचेही साम्राज्य

    गुन्हे रोखण्यासाठी एचएसआरपी बंधनकारक; मात्र अंमलबजावणी कधी ?

    निखिल मोरे / जळगाव  

    केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एचएसआरपी) लावणे बंधनकारक केले असतानाही जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर या नियमाकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने अजूनही जुन्या क्रमांकासह रस्त्यावर धावत असून आरटीओ विभाग मात्र कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याची नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

    दरम्यान शहरात फॅन्सी नंबर प्लेटचेही प्रमाण वाढले असून, या अवैध क्रमांक पाट्या गुन्हेगारी कारवायांमध्ये वाहनांची ओळख लपवण्यासाठी सर्रास वापरल्या जात असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे.

    क्रमांकातील अंक व अक्षरांची मांडणी बदलणे, फाँटमध्ये छेडछाड करणे, किंवा आकर्षक डिझाईनच्या नावाखाली क्रमांकच अस्पष्ट ठेवणेहे प्रकार सर्रास दिसत असून, मोटार वाहन कायदा 1988 व नियम 1989नुसार या प्लेट पूर्णपणे बेकायदेशीर आहेत. तरीही शहरात यावर ठोस कारवाई होत नसल्याने वाहनधारकांच्याच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षा प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना वाढत आहे.

    एचएसआरपी का आवश्यक?

    गुन्ह्यांमध्ये वाहनांचा वाढता वापर, चोरीच्या घटना आणि क्रमांक पाट्यांवरील छेडछाड रोखण्यासाठी केंद्राने एचएसआरपी अनिवार्य केली आहे. अ‍ॅल्युमिनियमपासून तयार केलेली ही प्लेट युनिक नंबर, लेझर-कोडेड होलोग्राम आणि चेसिस-इंजिन नंबरसह येते. प्रेशर मशीनने उमटवलेले हे अंक बदलणे किंवा मिटवणे जवळपास अशक्य असल्याने गुन्हे शोधण्यात मोठी मदत होते.

    शुल्क किती?

    दुचाकी: ५३१ रुपये

    चारचाकी: यात श्रेणीनुसार वेगवेगळे शुल्क लागू होते.

    कोणत्या वाहनांना बंधनकारक?

    २०१९ पूर्वी नोंदणी झालेली सर्व दुचाकी आणि चारचाकी वाहने. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार निर्धारित मुदतीत प्लेट न बसवल्यास दंडाची कारवाई बंधनकारक.

    ऑनलाईन अर्जात अडचणी

    एचएसआरपी मिळण्यासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा असली तरी अनेक नागरिकांना पोर्टलवर तांत्रिक अडचणी, माहिती अपलोड न होणे, स्लॉट न मिळणे अशा समस्या भेडसावत आहेत. आरसीबुकची माहिती पूर्ण आणि अचूक असणे गरजेचे असून या प्रक्रियेतील त्रुटी तातडीने दूर करण्याची मागणी होत आहे.

     

    नियमांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी शहरातील वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने संयुक्त मोहीम राबवून अशा वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. “२०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना एचएसआरपी लावणे अत्यावश्यक असून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असे आरटीओकडूनही पुन्हा एकदा आवाहन करण्यात आले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    jalgaon RTO
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif