Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अकरावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवले जीवन
    गुन्हे वार्ता

    अकरावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवले जीवन

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 3, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अकरावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवले जीवन

    जळगाव (प्रतिनिधी) शहरातील पिंप्राळा भागातील गणपती नगर येथे इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२:३० वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे कुटुंबीय आणि नातेवाईकांवर शोककळा पसरली असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कुटुंबीयांनी मनहेलावणारा आक्रोश केला. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिस तपास करत आहेत.

    कृष्णा राहुल सोनवणे (वय १६) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मुंबई येथे वडिलांसोबत राहून इयत्ता अकरावीला शिकत होता. कृष्णाचे आई-वडील विभक्त झाले असून, वडील मुंबईत तर आई पिंप्राळा हुडको परिसरात राहते. कृष्णा आणि त्याचा मोठा भाऊ मुंबईत वडिलांकडेच राहतात. दोन दिवसांपूर्वीच आईला भेटण्यासाठी तो जळगावला आला होता. गुरुवारी रात्री राहत्या घरी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

    घटनेची कल्पना येताच कुटुंबीयांनी कृष्णाला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराने रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती आणि कुटुंबीयांना गंभीर मानसिक धक्का बसला आहे. या घटनेमुळे परिसरात शोकाची लाट उसळली असून, शेजारील नागरिकांनीही हळहळ व्यक्त केली.

    रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

    CTIME jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार

    August 17, 2026

    शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण

    August 17, 2026

    फुलगावसह पिंपळगाव येथे दोघांची आत्महत्या

    August 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif