Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»पोलीस कर्मचाऱ्याकडून लग्नाचे आमिष देऊन पाच वर्षे अत्याचार; कोलकात्यातील महिलेची जळगाव पोलिसात तक्रार
    गुन्हे वार्ता

    पोलीस कर्मचाऱ्याकडून लग्नाचे आमिष देऊन पाच वर्षे अत्याचार; कोलकात्यातील महिलेची जळगाव पोलिसात तक्रार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 24, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पोलीस कर्मचाऱ्याकडून लग्नाचे आमिष देऊन पाच वर्षे अत्याचार; कोलकात्यातील महिलेची जळगाव पोलिसात तक्रार

    जळगाव | लोकशाही न्यूज नेटवर्क

    सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर, पोलीस कर्मचाऱ्याने लग्नाचे खोटे आश्वासन देत पाच वर्षांहून अधिक काळ एका महिलेसोबत अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिला कोलकात्यातील असून, तिने जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

    सूत्रांची दिलेली महिती अशी कि , या प्रकरणातील मुख्य आरोपी नितीन सपकाळे हा जळगाव पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, २०१७ साली फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर नितीनने स्वतःला अविवाहित असल्याचे भासवले आणि लग्नाचे आमिष देत मैत्री केली.

    महिलेने नितीनवर विश्वास ठेवून कोलकाताहून अनेकदा जळगाव गाठले. या दरम्यान, तिच्या इच्छेविरुद्ध नितीनने हॉटेल्समध्ये नेऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप आहे.
    २०२० मध्ये पीडितेला नितीन आधीच विवाहित असून त्याला मुलगी असल्याचे समजले. त्यानंतरही त्याने पत्नीला घटस्फोट देतो, असे सांगून तिची फसवणूक चालूच ठेवली.

    २०२५ मध्ये नितीनने स्पष्टपणे लग्नास नकार दिला. त्यानंतर, त्याने व त्याच्या कुटुंबीयांनी पीडित महिलेवर दबाव आणून एका मंदिरात जबरदस्तीने लग्न लावून दिले, परंतु काही दिवसांतच हे लग्न अमान्य ठरवत तिला सोडून दिले.

    २३ सप्टेंबर रोजी पीडितेने वकिलांच्या मदतीने तक्रार दाखल केली. या प्रकरणी नितीन सपकाळे, त्याची पत्नी आणि आई या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कलम 376 (अत्याचार), 417 (फसवणूक), 506 (धमकी) आदी अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

    #crime jalgaon jalgaon city police
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    धानोऱ्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर सायबर डल्ला!

    August 9, 2026

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif