बसमध्ये चढणाऱ्या वृद्धेच्या गळ्यातून चोरट्याने सोनपोत लांबविली !

0

बसमध्ये चढणाऱ्या वृद्धेच्या गळ्यातून चोरट्याने सोनपोत लांबविली !

जळगाव प्रतिनिधी
बसमध्ये चढत असतांना एका ७५ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातून अज्ञात चोरट्याने सोनपोत तोडून लांबविल्याचा प्रकार शहरातील टॉवर चौकाजवळ असणाऱ्या उड्डाणपुलानजीक सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला पोत लंपास केल्यानंतर वृद्ध महिला आणि तिच्या पतीने आरडाओरड केला मात्र चोरटा खासनात रफूचक्कर झाला. याबाबत उशिरा रात्री शहर पोलिस स्टेशनला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला .

यावल तालूक्यातील सांगवी खुर्द येथील मूळ रहिवासी असलेले अल्पभुधारक शेतकरी सदाशिव डिगंबर कोळी (वय-७९) पत्नी जयवंताबाईसह जळगावात आले होते. त्यांनी जखमी असलेल्या आपल्या नातवाची भेट घेवुन त्यांच्या सांगवी या गावाला जाण्यासाठी निघाले होते.

शिवाजीनगर उड्डाणपुला जवळील बसस्टॉपवर बस आल्यानंतर या वृद्ध दाम्पत्यांनी बसमध्ये चढत असतांनाचोरट्याने धक्काबुक्की करून वृद्ध महिलेच्या गळ्यातील आठ ग्रॅम वजनाची पोत तोडून पसार झाला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.