Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरुन पडून अधिक्षक अभियंत्याचा मृत्यू
    उत्तर महाराष्ट्र

    अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरुन पडून अधिक्षक अभियंत्याचा मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 28, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरुन पडून अधिक्षक अभियंत्याचा मृत्यू

    जळगाव प्रतिनिधी तापी पाटबंधारे महामंडळ विभागात अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या अभियंत्यांचा अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरुन पडल्याने यांचा मृत्यू झाल्याची घटना घटना गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अधीक्षक अभियंता अरुण बाबूराव ढवळे (वय ४०, रा. संभाजी चौक, महाबळ) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

    शहरातील संभाजी चौकातील मातोश्री हाईट्स या अपार्टमेंटमध्ये अरुण ढवळे हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास होते. शहरातील तापी पाटबंधारे विभागात ते अधीक्षक अभियंता म्हणून नोकरीस होते. गुरुवारी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास ते अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरुन पडून गंभीर जखमी झाले. ही घटना अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी जखमी ढवळे यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांचे निधन झाले.

    अरुण ढवळे हे तापी पाटबंधारे विभागात नोकरीस असल्याने त्यांची पदोन्नती झाल्याने ते तीन महिन्यांपुर्वी जळगावात पदोन्नती होवून आले होते. मातोश्री हाई-ट्स या अपार्टमेंटमध्ये ते भाडेतत्ववार कुटुंबियांसह राहत होते. परंतू दुर्देवी काळाने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तीन महिन्यांपूर्वीच त्यांच्या पदोन्नतीमुळे ते जळगावात आले होते आणि मातोश्री हाईट्स अपार्टमेंटमध्ये भाडेतत्वावर कुटुंबासह राहत होते. दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime accident
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif