Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»गरम पाण्याने गंभीर भाजलेल्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यु
    ताज्या बातम्या

    गरम पाण्याने गंभीर भाजलेल्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यु

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 14, 2025No Comments5 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    गरम पाण्याने गंभीर भाजलेल्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यु

    जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील वाटीका आश्रम परिसरात घडलेल्या हृदयद्रावक घटनेत गरम पाणी अंगावर पडल्याने गंभीर भाजलेल्या चार वर्षीय चेतन जितेंद्र पाटील या चिमुकल्याचा बुधवारी दुपारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

    जितेंद्र पाटील हे एसटी वर्कशॉपमध्ये नोकरीस असून त्यांचा मुलगा चेतन हा आठ दिवसांपूर्वी घरात खेळत असताना आईकडे पोहे खाण्याचा हट्ट धरत होता. त्याची आई स्वयंपाकाची तयारी करत असताना चेतन खेळत खेळत घरातील बाथरुममध्ये गेला. तेथे ठेवलेल्या बादलीतील उकळते गरम पाणी चुकून त्याच्यावर ओतले गेले आणि तो गंभीर भाजला.

    कुटुंबीयांनी तत्काळ त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. परंतु भाजलेल्या जखमांमुळे त्याची प्रकृती सतत बिघडत गेली. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चेतनची प्राणज्योत मालवली.

    या घटनेमुळे पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातील नागरिकांत हळहळ व्यक्त केली जात आहे. एसटी विभागातील आनंदा कौतीक सपकाळे आणि रविंद्र सोनवणे यांनी उपचारासाठी आर्थिक मदतही जमा केली होती; मात्र देवाने न्याय केला नाही.

    या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात सायंकाळी ६ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास उपनिरीक्षक शामकुमार मोरे करीत आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगावात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

    October 3, 2026

    कॅबप्रमाणेच आता एका क्लिकवर मिळणार रुग्णवाहिका!

    October 3, 2026

    ‌‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास‌’ आता ऑनलाइन!

    October 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif