जळगावात सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढणाऱ्यावर कारवाई

0

जळगावात सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढणाऱ्यावर कारवाई

जळगाव प्रतिनिधी

सार्वजनिक ठिकाणी गांजासारखे गुंगीकारक पदार्थ चिलीमद्वारे ओढणाऱ्यावर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील तांबापूरा परिसरातील जुम्मा शहा वखारीजवळ संशयित गोकुळ भरत बाटुंगे (वय ४२, रा. तांबापुरा) हा दि. २ रोजी दुपारच्या सुमारास गांजा सारख्या अंमली पदार्थाचे स्वेन करतांना आढळून आला .

एमआयडीसी पोलिसांकडून संशयित गोकुळ बाटुंगे याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून सहाशे रुपयांचा गांजा आणि चिलीम मिळून आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ सचिन पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.