जळगावमध्ये टॉवर चौकाजवळ शिवराम लॉजला भीषण आग (पहा व्हिडिओ)
आगीत फर्निचर ,गाद्या, चादरींसह इतर साहित्य जळून खाक
जळगावमध्ये टॉवर चौकाजवळ शिवराम लॉजला भीषण आग (पहा व्हिडिओ)
आगीत फर्निचर ,गाद्या, चादरींसह इतर साहित्य जळून खाक
जळगाव प्रतिनिधी ;- शहरातील टॉवर चौकाजवळ असणाऱ्या विलास लॉज शेजारी असणाऱ्या शिवराम लॉजच्या इमारतीला अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली होती. हि घटना पावणे पाच वाजेच्या सुमारास घडली . आजची माहिती करतात अग्निशामक दलाच्या तीन बंबांनी ही आग आटोक्यात आणली. सुमारे तासभर चाललेल्या या आगीमध्ये विविध साहित्य जळून खाक झाले. आगीमध्ये पाच ते सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला.
नवी पटेल नावाच्या व्यक्तीने अग्निशामक दलाच्या विभाग कार्यालयात खबर दिल्यावरवरून नवजीवन दुकानच्या बाजूला शिवराम लॉजिंग टॉवर चौक येथे आग लागली असल्याची माहिती दिली. घटनास्थळी महापालिकेच्या तीन अग्निशामक बबांनी तिसऱ्या मजल्यावर शर्तीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात या आगीमध्ये फर्निचर, एसी ,पंखे ,गादी चादर ,इत्यादी साहित्य जळून खाक झाले असून यात लॉज मालकाचे सुमारे पाच ते सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून या आगीत एका व्यक्तीला झळ लागली मात्र तो घाबरल्यामुळे या ठिकाणाहून तो निघून गेल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
आग विझवणारे अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी , अश्वजीत घरडे ,वाहन चालक देविदास सुरवाडे, संतोष तायडे, संजय भोईटे फायरमन रोहिदास चौधरी, विजय पाटील ,भगवान पाटील ,सरदार पाटील, जगदीश साळुंखे ,तेजस जोशी , गिरीश खडके यांनी आग तत्परतेने आटोक्यात आणली.