जुन्या वादातून तरुणाला बेदम मारहाण करीत वीट मारून डोके फोडले !

0

जुन्या वादातून तरुणाला बेदम मारहाण करीत वीट मारून डोके फोडले !

जळगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क 

मामासोबत वाद का केला, याबाबत विचारणा केल्याच्या रागातून तिघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात त्याच्या डोक्यात विट मारून गंभीर जखमी करण्यात आले. हा प्रकार १ एप्रिल रोजी सायंकाळी एस.के. ऑईल मिल जवळ घडला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील भारत नगर येथील दीपक सोनार हा आपल्या मित्रांसह गप्पा मारत उभा होता. त्यावेळी रिक्षातून राहुल उर्फ घाऱ्या भगत, विक्की शेठ, बंटी बनसोडे, मिलींद व त्यांच्यासोबत अन्य तीन जण त्या ठिकाणी आले. दीपकने राहुलला “माझ्या मामासोबत वाद का घातला?” असे विचारताच तो संतापला आणि त्याच्या साथीदारांसह दीपकवर हल्ला चढवला.

मारहाणीच्या दरम्यान, राहुल भगतने जमिनीवर पडलेली विट उचलून दीपकच्या डोक्यात जोरात मारली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने फैजल खानने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या दीपकवर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी दीपक सोनारच्या तक्रारीवरून राहुल उर्फ घाऱ्या अर्जुन भगत, विक्की शेठ, बंटी बनसोडे, मिलींद (पूर्ण नाव माहिती नाही) व इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.