Sunday, May 29, 2022

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

अ‍ॅपेक्स रुग्णालयात एका महिलेचा प्रसृतीनंतरच्या शस्त्रक्रियेदरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्याने पहाटे दोन वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या पतीसह कुटुंबीयांनी केला आहे. तर, डॉक्टरांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

- Advertisement -

पूजा जयप्रकाश विश्‍वकर्मा (वय ३०) असं मयत विवाहितेचं नाव आहे. गणेश कॉलनी परिसरातील श्रीकृष्ण कॉलनीत जयप्रकाश विश्‍वकर्मा हे वास्तव्यास आहेत. जयप्रकाश यांची पत्नी पूजा हिस प्रसूतीसाठी शुक्रवारी सकाळी डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्याकडे दाखल करण्यात आले. याठिकाणी नाॅॅर्मल प्रसूती होऊन मुलगा झाला. त्यानंतर सायंकाळी पूजा हिची प्रकृती खालावली असता डॉक्टरांकडून विश्वकर्मा कुटुंबीयांना तिला अपेक्स रुग्णालयात दाखल करावे लागेल, असे सांगण्यात आले.

यानंतर पूजाला अ‍ॅपेक्स हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. रक्तस्त्राव थांबत नसल्याने डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्यासह इतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शस्त्रक्रिया पार पडली. यावेळी पूजा हिची प्रकृती ५० टक्के चांगली असून ४८ तासापर्यंत तिला अतिदक्षता विभागात निरिक्षणाखाली ठेवण्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. यानंतर दोन वाजेच्या सुमारास पूजाची प्रकृती पुन्हा खालावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पती जयप्रकाश हे पाहण्यासाठी गेले असता, पूजा हिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. मयत पूजा हिची दुसरी प्रसूती आहे, यापूर्वी तिला एक मुलगा आहे. आता जन्माला आलेल्या बाळाची प्रकृती उत्तम आहे. मात्र, त्याचा चेहरा पाहण्याआधीच पूजाचा मृत्यू झाला.

नॉर्मल प्रसूती असताना अचानक प्रकृती कशी खालावली. पूजाचा आधीच मृत्यू झालेला होता असा आरोप जयप्रकाश यांनी केला आहे. मात्र, डॉक्टरांनी उशिरा कळविले. मृत्यूनंतर लगेचच बिल व इतर कागदोपत्री प्रक्रिया करण्यास सांगण्यात आले. याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पूजाचा मृत्यू झाला असून कारवाई करावी. इन कॅमेरा शवविच्छेदन करावे. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊ, असं जयप्रकाश व त्यांच्या कुटुंबीयांनी पवित्रा घेतला आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या