ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणे भोवले !

"त्या" तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन, व्हिडीओ तुफान व्हायरल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कालपासून अहिराणी भाषेतील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. वाहतूक पोलिसाने एका ट्रकचालकाकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पाचोरा पोलीस ठाण्यातील तीन वाहतूक पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.

व्हिडिओमध्ये वाहतूक पोलीस पवन पाटील एका ट्रकचालकाकडून ५० रूपये घेत असल्याचे दिसत आहे. या घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तातडीने चौकशी करून पवन पाटील यांना निलंबित केले आहे. या घटनेच्या प्राथमिक तपासात पवन पाटील यांनी ट्रकचालकाकडून ५० रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

या व्हिडिओमध्ये आणखी दोन वाहतूक पोलीस कर्मचारी चेतन सोनवणे आणि गुलाबराव मनोरे हेही उपस्थित असल्याने त्यांची भूमिका संशयास्पद आढळून आली आहे. त्यामुळे त्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.