जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात काल विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यांनतर अनेक माध्यमांनी आपला एक्झिट पोल सादर केला. दरम्यान जळगाव जिल्ह्यात सरासरी 65.77 टक्के मतदान झालं असून २३ नोव्हेंबरला निकाल लागणार असून त्यापूर्वी जळगाव शहरातून भाजप आणि ठाकरे गटात लढाई आहे. भाजपचे सुरेश भोळे यांची लढत ठाकरे गटाचे जयश्री महाजन यांच्यासोबत होती. जळगाव शहरातून भाजपचे सुरेश भोळ विजयी होण्याची शक्यता आहे.
जळगाव शहरात सुरेश भोळे यांनी २०१९ मध्येही निवडणुक चांगल्या मताने जिंकली होती. या मतदारसंघात ठाकरे गटाचे बंडखोर वसंत पाटील हेदेखील रिंगणात आहेत. तर मनसेकडून अनूज पाटील हेदेखील रिंगणात आहे. त्यामुळे बहुरंगी लढत होताना दिसत आहे. परंतु गेल्या १० वर्षांपासून सुरेश भोळे यांनी केलेल्या विकासाच्या कामांवर त्यांनी मतदान करण्याचे आवाहन केले आहे.