जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
नुकताच एसटी महामंडळाने एसटी तिकीटात दरवाढ केली असून तिकीट दरात तब्बल १५ टक्क्यांची वाढ झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. यातच एसटीच्या केलेल्या भाडेवाढ विरोधात शिवसेना ठाकरे गटाने जळगावमधील नवीन बस स्थानक येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
राज्य शासनाने परिवहन महामंडळाच्या प्रवासी वाहतूक भाडेवाडी विरोधात उबाठा शिवसेना जळगाव महानगरच्या वतीने शहरातील नवीन बस स्थानक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी उबाठा शिवसेना सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ व शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, उपमहा नगरप्रमुख प्रशांत सुरळकर, महिला आघाडी महानगर प्रमुख मनीषा पाटील, गायत्री सोनवणे, युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, उपमहा नगरप्रमुख नीता सांगोळे, विभाग प्रमुख किरण भावसार, अण्णा भोईटे, कुसुंबा ग्रामपंचायत सदस्य प्रमोद घुगे, गणेश सोनवणे, शोएब खाटीक, निलेश ठाकरे, विजय बांदल, संजय सांगळे, शरीफ रंगरेज, कलीम खान, हर्षल मुंडे, राधे बाविस्कर आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.