Saturday, October 1, 2022

तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी जवळील हनुमान नगर परीसरात एका २१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

शहरातील रामेश्वर कॉलनी, मेहरूण परिसरातील हनुमान नगरात ज्ञानेश्वर अर्जुन पाटील (वय २१) या तरुणांने काल दि.१ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरात कोणी नसताना छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर आत्महत्याचे कारण मात्र समजले नाही. ज्ञानेश्वर हा जळगाव शहरातील फुले मार्केट येथे एका भांड्यांच्या दुकानात कामाला होता. त्याच्या पश्चात आई – वडील , २ बहिणी १ लहान भाऊ असा परिवार आहे. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप समजले नाही.

याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली असुन पुढील तपास पो.ना. दत्तात्रय बडगुजर पोलिस करीत आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या