Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»घरात लग्नाची धामधूम अन्‌ तरुणाचा टोकाचा निर्णय
    जळगाव जिल्हा

    घरात लग्नाची धामधूम अन्‌ तरुणाचा टोकाचा निर्णय

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 14, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    जळगावात एका तरुणासोबत अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. तरुणाचे आठ दिवसांवर लग्न आले असताना त्याने आपले आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवाने टोकाचे पाऊल उचलले आहे. सोमवारी रात्री तरुणाने कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर तो शेतात गेला, मात्र घरी परतलाच नाही. त्यानंतर शेतात झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले.

    लग्न घरात लग्नाची धामधूम सुरु होती. पाहुणे मंडळींना पत्रिका वाटप सुरु होते. आठवडाभरात लग्न आल्याने घरात तयारी आणि आनंदाचे वातावरण होते असे असताना उपवर अमोल वाल्मीक पाटील (वय 21, रा. वाकडी, ता. जळगाव) या तरुणाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील वाकडी येथील शेतामध्ये मंगळवार दि. 13 मे रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लग्नाच्या आनंदाच्या क्षणी होणाऱ्या नवरदेवाने टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

    वाकडी येथे आई, वडील, दोन भावांसह राहणारा अमोल पाटील हा वडिलांना शेती कामात मदत करत होता. अमोल याचे खामखेडा, ता. मुक्ताईनगर येथील मुलीशी लग्न ठरले होते. दि.20 मे रोजी हळद आणि दि. 21 मे रोजी लग्न असल्याने घरात लग्नाची तयारी देखील सुरू होती. सोमवार दि. 12 मे रोजी रात्री जेवण झाल्यानंतर तो शेतात गेला. नंतर घरी परतलाच नाही. सकाळी काही ग्रामस्थांना अमोल पाटील हा शेताच्या बाजूला एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. याची माहिती तात्काळ त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली. त्याला लगेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून अमोल याला मृत घोषित केले. लग्नाच्या केवळ आठ दिवस आधी तरुणाने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामागे नेमके कारण काय होते, लग्न जवळ आले असताना त्याने आयुष्य संपवण्याचा निर्णय का घेतला? हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही.

    jalgaon Sucide
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026

    अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घराचे कुलूप तोडले

    June 9, 2026

    उशिराने लग्न लागल्यामुळे वधू वर पक्षाला 2 हजारांचा दंड

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif