जळगाव ST वर्कशॉपमध्ये 2 लाखांचा अपहार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

नेरीनाका येथे जळगाव (Jalgaon) बस आगाराचे एसटी वर्कशॉप (Jalgaon ST Workshop) विभागीय भंडार आहे. या ठिकाणी लिपिकानेच १ लाख ९९ हजार ३७० रुपयांची अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) सदर लिपिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेरीनाका येथील एसटी वर्कशॉप विभागीय भांडारात बसेस दुरुस्तीसह इतर सामान ठेवले जातात. या ठिकाणी हेमराज युवराज पाटील रा. चिंचोली ता. यावल हे लिपिक म्हणून काम करतात. 15 मार्च 2019 ते 24 सप्टेंबर 2019 दरम्यान हेमराज पाटील यांनी ट्रान्सपोर्टमधून सामान सोडवण्यासाठी 1 लाख 99 हजार 370 रुपयांची वेळोवेळी अग्रीम रक्कम उचलून या रकमेचा समायोजन न करता याचा अपहर केल्याचे उघडकीस आले आहे.

सदर प्रकार विभाग भंडाराचे अधिकारी विशाल बळीराम राखुंडे (वय 42) यांच्या लक्षात आले. त्यांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार मंगळवार 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी लिपिक हेमराज युवराज पाटील रा. चिंचोली ता. यावल जि. जळगाव याच्या विरोधात अपहार केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.