पोलिस अधीक्षक यांची माहिती ; आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत
जळगाव :- जळगावात कलिंका माता मंदिर परिसरात १जून रोजी सकाळी सडे नऊ वाजेच्या सुमारास दोन हेल्मेटधारी आरोपींनी बँक मॅनेजरला जखमी करून १७ लाखांची रोकड आणि तीन कोटी साठ लाखांचा ऐवज लुटून फरार झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा पोलिस दलासमोर आव्हान निर्माण झाले होते.मात्र शनिपेठ आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत या दरोड्याची अवघ्या ३६ तासांत उकल झाली आरोपीना राग जिल्ह्यातील कर्जत येथून मुद्देमालासह तीन जणांना अटक करण्यात आली. आरोपींकडून १६ लाख ४० हजार रोख आणि तीन कोटी साठ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. मुख्य आरोपी शंकर रमेश जासक ,,रमेश शंकर जासक , आणि बँक कर्मचारी मनोज रमेश सूर्यवंशी अशी आरोपींची नावे आहेत. आरोपीना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी सांगितले कि, १ जून रोजी जळगावातील कालीन्का मंदिर जवळील स्टेट बॅँकेच्या शाखेत सकाळी २ हेल्मेटधारी यांनी येऊन बँक मानेजरला जखमी करून इतर कर्मचार्यानाचे हातपाय बांधून ३ कोटी ६० लाखांचे तारण ठेवलेले दागिने आणि १७ लाखांची रोकड चोरून नेली होती. या मोठ्या घटनेमुळे जिल्हा पोलीस डॅलसमोर आव्हान उभे ठाकले होते. यासाठी जिल्हा पोलीस अधिकांश एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे पथक तयार करण्यात आली होती.
यांचा होता पथकात समावेश
पोलिसांच्या तपासात बँक कर्मचारी व फिर्यादी तथा आरोपी मनोज सूर्यवंशी यांच्या जबाबात तफावत आढळून आल्याने संशयाची सुई मनोज सूर्यवंशी यांच्यावर होती . त्याची अधिक विचारपूस केली असता त्याने हा गुन्हा माझा पाहुणा शंकर जसक व त्याचे वडील रमेश जासक आम्ही तिघांनी मिळून केल्याचे काबुल केले. चोरीचे पॆसे आणि दागिने हे शंकर जसक यांच्याकडे असल्याची माथी त्याने दिल्यानुसार पथकाने रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे जाऊन दोन्ही बापलेकांच्या मुसक्या आवळून त्यांना मुद्देमाला आरोपींची विचारपूस केली असता सह जळगावात आणले.
शंकर जासक यांचा मिळाले पत्यावर शोध घेवून त्यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता समजुन आले की, तो पोलीस उप निरीक्षक पदावर रायगड जिल्ह्यात नेमणुकीस असून ऑक्टोबर २०२१ पासुन कर्तव्यावर गैरहजर असल्याचे समजून आले आहे. त्याने त्याचा शालक मनोज सुर्यवंशी हा स्टेट बँक ऑफ इंडीया कालका माता जळगाव येथे ऑफिस बॉय म्हणून करार पध्दतीने नौकरीस असल्याने त्याचे सोबत संगणमत करून शंकर रमेश जासक, त्याचे वडील रमेश राजाराम जासक व शालक मनोज रमेश सुर्यवंशी अश्यांनी केला असून त्याने बँकेतून नेलेले (गेलामाल ६०९५.८४ ग्रॅम वजानाचे ३,६०,००,०००/- रु. किं.चे सोने व १७,१०,३७०/- रु. रोख कॅश) पैकी आरोपी शंकर रमेश जासक याने त्याचे घरातून (मिळाला माल ६०१५.८४ ग्रॅम वजानाचे ३,६०,००,०००/- रु. किं. चे सोने व १६,४०,३७०/- रु. रोख कॅश) हि काढून दिली असून ती सदर गुन्हयाकामी ताब्यात घेतली आहे.
पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत, परिरक्षावधीन उप विभागीय पोलीस अधिकारी सतिष कुलकर्णी, परि उप विभागीय पोलीस अधिकारी, आप्पासाहेब पवार, एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजनपाटील, शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपस करण्यात आला .
यांनी केली कारवाई
किसन नजनपाटील,यांनी ३ पोलीस पथक तयार करून पथकात आप्पासाहेब पवार, परि उप विभागीय पोलीस अधिकारी, शंकर शेळके, पोलीस निरीक्षक, शनिपेठ पो.स्टे. श्री. गणेश वाघमारे, पोलीस उप निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांचे सोबत स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव कडील पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांचे वेगवेगळे पथक यांनी तसेच शनिपेठ पो.स्टे. कडोल पोलीस अधिकारी / अमंलदार PSI चांदेलकर, पोउनि मुबारक तडवी, पोह परिष जाधव, राहुल पाटील, अनिल कांबळे, राहूल घेटे, विजय निकम, किरण वानखेडे, मुकुदा गंगावणे, अमोल विसपुते, गिरीष पाटील, अश्वीन हड़पे, अभिजीज सैंदाणे, सुनिल पवार, इंगळे यांचे पथक तयार करून कर्जत येथे पाठवून सदर गुन्ह्याचा तपास मा.एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक सो. जळगाव, मा. श्री. चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्री संदिप गावीत, उप विभागीय पोलीस अधिकारी जळगाव भाग यांचे मार्गदर्शना खाली श्री शंकर शेळके, पोलीस निरीक्षक, शनिपेठ पो.स्टे. हे करीत आहेत.