जळगावात बंद घर फोडून दागिन्यांसह रोकड लंपास

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील सोनी नगरात बंद घर फोडून  लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि रोकड असा एकुण ७० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमंत प्रदीप सूर्यवंशी (वय ३१, रा. सोनी नगर, पिंप्राळा परिसर, जळगाव) हे आपल्या पत्नी व दोन मुलांसोबत राहतात. ते खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह भागवतात. १ नोव्हेंबर रोजी हेमत सुर्यवंशी हे पत्नीसह सासरवाडी नादेड येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी घर बंद करून घेतले होते. दरम्यान नांदेड येथील काम आटोपून पुन्हा सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता सोनी नगर येथील राहत्या घरी आले.

यावेळी त्यांना कंम्पाऊंड गेटचे कुलूप तोडलेले दिसले, घरात लोखंडी ग्रीलचा दरवाजा देखील तोडून आत प्रवेश करत घरातील लोखंडी कपाटातून सोन्याचे व चांदीचे दागिने, लॅपटॉप आणि मोबाईल असा एकुण ७० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संजय सपकाळे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.