राजकारणाच्या साठेमारीत विकासाचे तीन तेरा…!

0

लोकशाही संपादकीय लेख

जळगाव जिल्ह्याचे राजकारण (Jalgaon Politics) सध्या तापले आहे. राजकीय नेते (political leaders)  एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, वार पलटवार करीत असल्याने सर्वसामान्य प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शिवसेना नेते उद्धव ठाकरे (Shiv Sena leader Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यापासून गेल्या चार महिन्यात राज्यात शिंदे फडणवीसांचे सरकार (Shinde Fadnavis Govt)  अस्तित्वात आल्यापासून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांत व्यक्तिगत पातळीवर घमासान चालू आहे. जळगाव जिल्हा त्याला अपवाद नाही. नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात राजकीय गदारोळ चालू आहे. जिल्हा सहकारी दूध संघाची निवडणूक (Jalgaon Jilha Dudh Sangh Election)  राजकीय प्रतिष्ठेचे बनली आहे.

शिवसेनेच्या पाच बंडखोर आमदारांच्या मतदार संघात तू-तू मै-मै चालू आहे. महाप्रबोधन यात्रेच्या (MahaPrabodhan Yatra) निमित्ताने सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या सभा गाजल्या. त्यातच मुक्ताईनगरची (Muktainagar) त्यांच्या सभेला परवानगी नाकारल्याने जिल्ह्यात चर्चेला उधाण आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) आणि सुषमा अंधारे यांच्यात आरोपांचा कलगीतुरा रंगला. सुषमा अंधारेंना नटी, बाळ, पार्सल संबोधणाऱ्या गुलाबराव पाटलांवर टीकेचा भडीमार झाला. कोटींवर गुन्हे दाखल करून त्यांना जिल्हा बंदी केली. या सर्वांचा परिणाम उद्धव ठाकरेची शिवसेना आणि शिंदे गटाचे शिवसेनेत जुंपली. त्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना वरचढ झाल्याचे चित्र निर्माण झाले. गुलाबराव पाटलांच्या निषेध आणि सोशल मीडियावर रान उठले.

अशातच दूध संघाच्या निवडणुकीत मात्र एकनाथ खडसे (Eknath Khadse) परिवाराला वगळून सर्वपक्षीय पॅनल बनवण्याचा आग्रह सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारमधील नेत्यांनी घेतल्याने वातावरण तापले. भाजपतर्फे (BJP) ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. खडसे गिरीश महाजन यांनी एकमेकांवर खालच्या थराला जाऊन आरोप प्रत्यारोपाने जिल्ह्यातील वातावरण तापले. त्यातच दहा वर्षांपूर्वी एकनाथ खडसेंच्या मुलाचा झालेला मृत्यू ‘आत्महत्या की खून’ असा आरोप गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी करून खळबळ उडवली. त्याचा परिणाम जिल्हा राष्ट्रवादीतर्फे (NCP) गिरीश महाजन यांच्या विरोधात निषेदाचे रान उठवले. त्याचे पडसाद जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत दिसून आले.

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षस्थानी हे नियोजन मंडळाच्या बैठकीत सदस्यांच्या प्रश्नाला पालकमंत्र्यांकडून उत्तरे अपेक्षित असताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून उत्तरे दिली जात होती. पालकमंत्र्यांवर गिरीश महाजन हावी होत आहेत असे चित्र नियोजन मंडळाच्या बैठकीत दिसत होते. म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DYCM Devendra Fadnavis) हेच राज्यकारभार चालवतात, असा आरोप होतोय. तसाच आरोप जळगाव जिल्ह्यात पालकमंत्र्यांवर होत आहे. एकंदरीत जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजन मंडळाच्या सभेला व्यासपीठ असताना तिथे सुद्धा राजकारण होत असल्याचे चित्र दिसून आले. नियोजन मंडळाची बैठक नव्हे, तर राजकीय आखाडा बनल्याचे चित्र दिसून आले.

अलीकडे राजकारणाचा स्तर घसरला आहे, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. जिल्ह्यात विकासाची अनेक कामे कोळंबून पडली असताना विकासाच्या प्रश्नावर चर्चा होऊन ते प्रश्न सोडवण्याऐवजी राजकारण सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रमुख नदी गिरणा नदीच्या (Girna River) पाण्याचा शेतीसाठी उपयोग करण्यासाठी या नदीत सात बलून बंधारे बांधण्याची घोषणा होऊन सात ते आठ वर्षे झाली. परंतु ही घोषणा घोषणाच राहिली. एकही बलून बंधारा अस्तित्वात आला नाही. सातपुडा पर्वतातील पाणी एकत्र करण्याचा मेगा रिचार्ज प्रकल्प कुठे गेला ? पाचोरा जामनेर गरिबांची रेल्वे म्हणून ओळखली जाणारी पी जे रेल्वे (P J Railway) तीन वर्षे झाली बंद अवस्थेत आहे, ती सुरू होत नाही. त्याबद्दल आमचे लोकप्रतिनिधी गप्पा आहेत. हातनुर धरणाच्या (Hatnur Dam) दुसऱ्या कालव्याचे काम होत नाही. त्यासाठी धरणाचे नवीन दरवाजे बांधण्याला मंजुरी मिळून सुद्धा ते काम थंड बस्त्यात आहे. हातनुर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पर्यटन स्थळाला मिळणाऱ्या मंजुरीचे काम काय झाले ? असे अनेक विकासाचे प्रश्न जिल्ह्यात प्रलंबित असताना राजकारण्यांना त्यांचा विसर पडला, हे जळगाव जिल्ह्याचे दुर्दैव म्हणता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.