Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव
    गुन्हे वार्ता

    जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव

    ३५ लाखांची सुपारी देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : पाच आरोपींना अटक
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 12, 2026No Comments558 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    शहरात संभाव्य गँगवार आणि हत्याकांडाचा कट जळगाव पोलिसांनी उधळून लावला आहे. भुसावळ येथील सराईत गुन्हेगारांचा खून करून त्यांच्या अंगावरील सोने लुटण्याच्या उद्देशाने आलेल्या आंतरजिल्हा टोळीतील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत चार गावठी कट्टे, नऊ जिवंत काडतुसे, धारदार शस्त्रे आणि विक्रीसाठी ठेवलेले ६२ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात ३५ लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

    रामानंद नगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ११ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री पिंप्राळा परिसरातील भवानीमाता मंदिर ते सिल्कमिलसमोरील मोकळ्या जागेत सापळा रचण्यात आला. इनोव्हा कारवर छापा टाकून खुशाल गजानन बोरसे (रा. खडकारोड, भुसावळ), संदीप बबन लोढे (रा. वाघनगर, जळगाव), राणू ऊर्फ ओमकार भदरगे (रा. शास्त्रीनगर, ठाणे), अरविंद विजय कांबळे (रा. कासोळा, जि. वाशिम) आणि सोनू महेंद्र जयस्वाल (रा. सातिवली, वसई, जि. पालघर) यांना अटक करण्यात आली.

    आरोपींकडून दोन गावठी कट्टे, सात जिवंत काडतुसे, धारदार सुरा, कोयता, मिरची पूड, दोऱ्या, मास्क, पाच मोबाईल फोन आणि इनोव्हा कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या मुद्देमालाची किंमत सुमारे ९ लाख ७७ हजार ६०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    अटक आरोपींची चौकशी केली असता त्यांनी खुनाच्या कटासाठी उमाळा (ता. जि. जळगाव) येथे खोली भाड्याने घेतल्याची माहिती दिली. पोलिसांनी या खोलीची झडती घेतली असता आणखी दोन गावठी पिस्तुले, दोन जिवंत काडतुसे, विक्रीसाठी ठेवलेले ६२ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) आणि इलेक्ट्रिक वजनकाटा जप्त केला. या मुद्देमालाची किंमत २ लाख २२ हजार ३०० रुपये आहे.

    पोलिसांच्या माहितीनुसार, भुसावळ येथील दुहेरी हत्याकांडात फरार असलेले बंटी पथरोड आणि शिव पथरोड यांनी मिथुन बारसे, क्रिश बारसे आणि करण यांचा खून करण्यासाठी ३५ लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यापैकी पाच लाख रुपये आगाऊ घेतल्याची माहिती तपासात समोर आली आहे. ११ ऑक्टोबरच्या मध्यरात्री मिथुन बारसे आणि क्रिश बारसे हे जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात कार्यक्रमासाठी आले असताना त्यांच्यावर हल्ला करून खून करणे आणि त्यांच्याजवळील सोने लुटणे, असा कट असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात बंटी पथरोड, शिव पथरोड, अभिषेक गोयर आणि मध्यस्थ रवी होळकर यांची आरोपी म्हणून गुन्ह्यात वाढ करण्यात आली आहे.

    रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९९/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेची कलमे ३१०(४), ३१०(५), ६१(२), शस्त्र कायद्याची कलमे ३/२५, ४/२५ तसेच एनडीपीएस कायद्याची कलमे ८(क) आणि २२(क) वाढविण्यात आली आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपींसह फरार आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमीही गंभीर आहे. बंटी पथरोड याच्याविरुद्ध १९, तर शिव पथरोड याच्याविरुद्ध १२ गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा आणि रामानंद नगर पोलिसांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणातील इतर आरोपींचा सहभाग आणि गुन्ह्याची व्याप्ती याबाबत पुढील तपास सुरू आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026

    गणेशोत्सवातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या

    November 7, 2026

    नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif