बापरे.. शासकीय ठेकेदाराला ७८ लाखांचा चुना

‘अंदर बाहर’ गेमचा नाद भोवला, जळगावात नेमकं काय घडलं ?

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव जिल्ह्यात आर्थिक फसवणुकीच्या अनेक घटना उघडकीस येत आहे.  ऑनलाईन गेम खेळा आणि भरघोस कमाई करा, असे अमिष दाखवत जळगावात एका शासकीय ठेकेदाराला 78 लाखांपेक्षा जास्त रुपयांचा चुना लावण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील जिल्ह्यातील पाचोरा येथील ठेकेदाराला ऑनलाईन गेम खेळण्याच्या नाद भोवला आहे. ऑनलाईन गेम खेळून भरघोस कमाई करा, असे आमिष दाखवत रोशन पद्मसिंग पाटील (वय २७) यांची तब्बल ७८ लाख ९० हजार ५०० रुपयांची ऑनलाईनरित्या फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ३ नोव्हेंबर २०२४ ते १२ जानेवारी २०२४ दरम्यान घडला. या प्रकरणी दोन जणांविरुध्द सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ? 

रोशन पाटील यांना ३ नोव्हेंबरला दोन जणांनी व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला. यावेळी त्यांनी एका वेबसाईटवर ‘अंदर बाहर’ आणि ‘अंदर बाहर २’ हे गेम खेळल्यास मोठ्या प्रमाणात पैसे जिंकू शकता, असे आमिष दाखवले. त्यावर विश्वास ठेवून रोशन पाटील यांनी तो गेम खेळण्यास सुरुवात केली. यानंतर त्या दोन भामट्यांनी रोशन पाटील यांना तुम्ही हा गेम जिंकला आहेत, असे भासवले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या बँक खात्यात 7 लाख रुपये जमा केले. यामुळे रोशन पाटील यांचा विश्वास बसला. यानंतर ते वेळोवेळी हा ऑनलाईन गेम खेळत गेले. यावेळी त्यांनी नेटबँकिंगद्वारे एकूण ७८ लाख ९० हजार ५०० रुपये यात गुंतवले. पण काही दिवसांनी ही रक्कम परत आलीच नाही. ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून पैसे मिळणे दूरच, उलट गुंतविलेली रक्कमही गेल्याने आपली फसवणूक झाल्याचे रोशन पाटील यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी त्यांनी साधणाऱ्या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.