अवजड ट्रक नाल्यात उलटल्याने क्लीनर गंभीर जखमी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

ट्रक चालक आणि त्यांचे वाहन चालवण्याचे कौशल्य सर्वांनाच ज्ञात आहे. जणू काही पुढे जाण्याची शर्यतीत भाग घेतल्यासारखे अवजड ट्रक एकमेकांना ओव्हर टेक करत चालवतांना आपण बघत असतो. आणि हाच शहाणपण कधी काळी त्यांच्या अंगाशी येऊन अपघात झाल्याचे बघायला मिळते. वावडदा (ता. जळगाव) गावाबाहेरील कुरकुरे नाल्यात मका घेऊन निघालेला ट्रक बुधवारी सायंकाळी उलटला. या अपघातात क्लीनर गंभीर जखमी झाला असून, चालक फरारी झाला आहे.

मध्य प्रदेशातून मक्याने भरलेला ट्रक (एमपी ३९, यूपी ७२९९) जळगावमार्गे गुजरातकडे निघाला होता. जळगाव सोडल्यानंतर शिरसोलीकडून वावडदा गावानजीक असलेल्या कुरकुरे नाल्यावरून जात असताना, चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक थेट नाल्याच्या खाली कोसळला.या अपघातात क्लीनर संजयकुमार पांडे (वय ३५, रा. बिहार) गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने जखमी क्लीनरला बाहेर काढून रुग्णालयात रवाना केले. तर ट्रक चालकाची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. सोबतच या संदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.