red baron coupon october 2012 babies r us coupons online march 2014 uwhc gift shop microsoft point gift cards gilly hicks coupon code 2013 woocommerce coupon generator importer pro
Thursday, December 1, 2022

पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा जागीच मृत्यू

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आलीय. शेख उस्मान शेख इस्माईल (वय ४०, रा. पिंपळा हुडको) असे मयत मजुराचे नाव आहे.

- Advertisement -

शेख उस्मान शेख इस्माईल (वय ४०, रा. पिंपळा हुडको) हा तरूण आज सकाळी १० वाजता जळगाव शहरातील गणेश कॉलनीमधील चंद्रप्रभा सोसायटी येथे बांधकामाच्या ठिकाणी कामाला आला होता. दरम्यान पाचव्या मजल्यावर काम करत असताना त्याचा तोल जाऊन थेट खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

उस्मान खाली पडल्यानंतर कामगारांनी त्याला तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी उस्मानला  मयत घोषित केले. सदर घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात प्रचंड गर्दी केली होती. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या