Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»दगडफेक करून प्राणघातक हल्ला करणारा फरार संशयित जेरबंद
    जळगाव

    दगडफेक करून प्राणघातक हल्ला करणारा फरार संशयित जेरबंद

    Tushar BhambareBy Tushar BhambareMay 24, 2022Updated:May 24, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    तरुणावर प्राणघातक हल्ला करुन त्याच्यावर दगडफेक केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील फरार असलेल्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.

    रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये झालेल्या वादाचा समझोता करण्यासाठी मयूर बागडे याने आकाश सोनार व ललित दिक्षीत याला ३ मे रेाजी रात्री ८ वाजेच्या सुमारास कंजरवाड्याजवळील चोखामेळा येथे बोलाविले होते. दरम्यान, आकाश हा त्याचे मित्र बबलू धनगर, अविनाश राठोड, निशांत चौधरी याच्यासोबत दुचाकींनी त्याठिकाणी आले. यावेळी आठ ते नऊ जणांसह दोन जणांनी त्यांच्याशी वाद घालून सोबत आणलेल्या कोयत्याने प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न करीत त्यांच्यावर दगडफेक केली होती.

    याप्रकरणी आकाश सोनार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसीपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील फरार असलेला संशयित आरोपी मयूर जमनादास बागडे शहरात आल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, सुधीर साळवे, किशोर पाटील, सचिन पाटील यांनी सोमवारी २३ मे रोजी रात्री संशयित आरोपी मयूर बागडे याला अटक केली. मंगळवारी २४ मे रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी देण्यात आली असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, किरण पाटील करीत आहे.

     

    crime news jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार

    August 17, 2026

    शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण

    August 17, 2026

    फुलगावसह पिंपळगाव येथे दोघांची आत्महत्या

    August 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif