Friday, May 20, 2022

सणोत्सव काळ व उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित करू नये

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

यंदा मार्च महिन्यातच उष्णतेची तीव्र लाट आली असून पारा ४५ अंश पोहचला आहे. उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत असून नागरिक उकाड्याने हैराण आहेत. एप्रिलच्या सुरुवातीपासून मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान काळ सुरू झाला आहे. बहुतांश नागरिकांचे रोजे असल्याने ते उकड्यात आपले कर्तव्य पार पाडत असतात. तसेच येणाऱ्या काळात श्रीराम नवमी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, भगवान महावीर जयंती असे सणोत्सव देखील येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसा आणि रात्री बेरात्री वीज पुरवठा खंडित होत असतो. बऱ्याच वेळा तर ऐन रोजा सोडण्याच्या वेळी किंवा नमाज पठण वेळीच वीज नसते.

- Advertisement -

उन्हाळ्याचे दिवस, रमजान महिना, श्रीराम नवमी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, भगवान महावीर जयंती असे सणोत्सव लक्षात घेता नागरिकांचे हाल टाळण्यासाठी वीज पुरवठा खंडित करू नये. तसेच विजेचा लोड वाढता असले तर सर्वांशी चर्चा करून योग्य तो वेळ लोडशेडिंगसाठी निश्चित करावा, जेणेकरून नागरिकांना त्याचा त्रास फारसा जाणवणार नाही. असे मागणीपर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतांना मो. आरीफ देशमुख, अशफाक मिर्ज़ा, ज़ाकिर पठान, शरीफ़ बाबा, विजय निकम, अमजद पठान, मजहर पठान, रियाज़ बागवान, जकी अहमद, सैफ पिंजारी, मोहसिन भिस्ती आदी उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या