चक्क हॉटेल फोडून दारूच्या बाटल्या आणि रोकड लंपास

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथील शेतामध्ये असलेले हॉटेल फोडून अज्ञात चोरट्यांनी देशी विदेशी दारूच्या बाटल्या आणि रोकड असा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी मंगळवारी २९ मार्च रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील पांडुरंग पाटील (वय ३६, रा. बिलवाडी ता. जि.जळगाव) यांचे बिलवाडी शिवारातील गट नंबर ६२ मध्ये त्यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात मामा- भांजा नावाची परमिट रूम हॉटेल आहे. शेती आणि हॉटेल चालवून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दैनंदिनीप्रमाणे सोमवारी २८ मार्च रोजी दिवसभर काम करून हॉटेल चालून रात्री ११ वाजता हॉटेल बंद करून ते घरी गेले.

दरम्यान सकाळी मंगळवारी २९ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास सुनील पाटील हे हॉटेलवर आले असता त्यांना हॉटेलमध्ये चोरी झाल्याचे दिसून आले. त्यावेळी तपासणी केली असता गल्ल्यातील १ हजार ५०० रूपये आणि देशी- विदेशी दारूच्या बाटल्या चोरून नेल्याचे उघड झाले.

याबाबत सुनील पाटील यांनी एमआयडीसी पोलीसांत धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी २९ मार्च रात्री अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक स्वप्नील पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.