जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ हे मुक्ताईनगर येथे म्हणून रुजु झाल्यापासून त्यांनी फक्त जनतेच्या हिताचे काम केलीत व कोणत्याही राजकारणाचे ऐकुन कोणत्याही गरीबावर अन्याय केलेला नाही. व होऊ दिलेला नाही. त्यांनी आजपर्यंत कोणाचेही दडपणाखाली येवून कोणत्याही निष्पाप व्यक्तीवर खोटे स्वरुपाचे गुन्हे होऊ दिले नाही. व केले नाही.
त्यामुळे काही गुन्हेगारी स्वरुपाचे असलेल्या परंतु समाजासमोर पांढरपेशी सभ्यपणाचा पोशाख दाखविणाऱ्या संसेच राजकीय लोकांच्या मर्जीप्रमाणे त्यांना हवे असतील तसे बेकायदेशिर कामे पोलीस निरीक्षक खताळ यांनी होऊ न दिल्यामुळे सदर व्यक्तीच्या मनात खताळ यांच्या विरुध्द व्देष आणि व्देषाची भावना उत्पन्न झाल्याने त्यांनी खताळ यांच्या विरुध्द षडयंत्र रचून त्यांना मुक्ताईनगर येथून बदली करण्याचे तसेच त्यांच्या मर्जीतील अधिकारी बेकायदेशिर प्रयत्न सुरु केले आहे. त्यामुळे त्यांनी खताळ यांच्या विरुध्द चुकीचे आरोप लावून बदली व्हावी यासाठी चुकीचे प्रयत्न करत असतानाच अचानक वरिष्ठ स्तरावरून त्यांची बदली झाली.
पोलीस निरीक्षक खताळ यांचे मुक्ताईनगरमध्ये पूर्ण तालुक्यात कायदा व सुव्यवस्था आबादीत राखून लोकांमध्ये प्रेमाची भावना निर्माण केलेली आहे. तसेच गुंड प्रवृतीच्या लोकांना बेकायदेशीर कामापासून रोखण्याचे यशस्वी प्रयत्न केल्यामुळे एकाबाजूला अशा गुंड प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीचे मधोमध साहेबांनी बदल व हिताचे वातावरण निर्माण केले तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य जनतेच्या मनातील दुर निर्माण झालेले असल्याने सर्व सामान्य जनता ही निर्भीड वातावरण जीवन जगत आहे.
खताळ यांच्यासारख्या प्रांजळ व प्रामाणिक व्यक्तीची व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली झाल्यास मुक्ताईनगर तालुक्यामध्ये जे चांगल्या स्वरुपाचे तसेच सौदर्याचे वातावरण आहे. यापुढे राहाण्याचे शाश्वती वाटत नसून कदाचित यापुढे मुक्ताईनगर तालुक्यामध्ये बेकायदेशीर कृत्यांना वाव मिळून गुन्हेगारी वाढेल. तरी खताळ साहेब यांच्या तात्काळ बदलीचा आदेश रद्द करण्यात यावा यासाठी महेंद्र प्रल्हाद उमाळे यांनी आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे.