Monday, September 26, 2022

तापी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा बुडून मृत्यू

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जळगाव ;शहरातील तापी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तालुक्यातील धामणगाव येथील २० वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सकाळी उघडकीला आली आहे. या घटनेची तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

अक्षय राजू सपकाळे (वय-२०) रा. धामणगाव ता. जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसान, अक्षय सपकाळे हा आई, वडील आणि तीन बहिणीसोबत वास्तव्याला आहे. आई व वडील शेती काम करून आपला उदरनिर्वाह करतात. तर अक्षय हा शहरातील एका कापड दुकानात काम करत होता.

दरम्यान, रविवार २० फेब्रुवारी रोजी अक्षय हा सकाळी ९ वाजेच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत धामणगाव जवळ असलेल्या तापी नदीवर पोहण्यासाठी गेले. पाण्यात पोहत असतांना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे.

अक्षय तापी नदीत बुडत असल्याचे लक्षात आल्याने मासे पकडणारे पट्टीचे पोहणाऱ्यांनी त्याला पाण्याबाहेर काढून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासले असता त्याला मयत घोषीत केले. यावेळी धामणगावातील मित्रपरिवार यांची मोठी गर्दी जमली होती.

यावेळी मयत अक्षयच्या नातेवाईकांसह मित्रांनी एकच आक्रोश केला होता. एकुलता एक मुलगा गेल्या सपकाळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. मयतच्या पश्चात आई, वडील आणि तीन बहिणी असा परिवार आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या