जळगाव रेल्वे स्थानकावर उभारले बाल सहाय्य्यता केंद्र

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारतीय रेल्वे प्रगतीपथावर असून त्याच आलेखाने केशवस्मृतीचे काम सुरु आहे. याच माध्यमातून समतोल प्रकल्पही काम करत आहे. २५ राज्यात सुमारे २००० बेवारस मुलांना आपल्या घरी पोहचविण्याचे कामही त्यांनी केले आहे. म्हणून समतोलचे कौतुक करावे तेवढे कमी असे आपल्या मनोगतात केंद्रीय प्रवासी उपभोक्ता समितीचे सदस्य डॉ.राजेंद्र फडकेंनी सांगितले. ते जळगाव रेल्वे स्थानकावर नव्याने उभारण्यात आलेल्या समतोल प्रकल्पाच्या बाल सहाय्य्यता केंन्द्राच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते.

पुढे ते म्हणले की, अशा चांगल्या कामांसाठी तुम्हाला ज्या-ज्या रेल्वे स्थानकावर समतोल प्रकल्पासाठी मदत हवी असल्यास मी सदैव तयार आहे असे म्हणत जळगाव- जालना- औरंगाबाद ट्रकचा प्रस्तावही मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. तर भुसावळ हुन सुरुवात झाल्यावर जळगाव रेल्वे स्थानकावर नवीन कॅबिनचे असणे कौतुकाची बाब आहे. याठिकाणाहून अनेक बेवारस लहान मुलांना आपल्या माता-पित्यांपर्यंत पोहोचविले, आम्ही जिथे कोणीच काम करत नाही अशा ठिकाणी काम करतो, अजूनही कोणत्या विषयात काम करण्यासारखे राहिले असल्यास आम्हाला सुचवावे असे आपल्या मनोगतात केशवस्मृती सेवासमुहाचे अध्यक्ष भरतदादा अमळकर म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर येवले यांनी केले. कार्याक्रमास प्रमुख पाहुणे भुसावळ विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे संदीप कासार, डॉ. महेंद्र काबरा, डॉ. नितीन चौधरी, डॉ. राजेश डाबी, स्टेशन प्रबंधक ए. एम अग्रवाल, भुसावळ आर.पी.एफ इन्स्पेक्टर दयानंद यादव, जळगाव जी.आर.पी पो.उ.नि राजेंद्र पाटील सह दिलीप चोपडा ,रत्नाकर पाटील, अनिल पवार, समतोल प्रकल्प प्रमुख राहुल पवार आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.