नवीन बस स्थानकातून महिलेचे 21 हजार रुपये लंपास 

0

 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

जळगाव नवीन बसस्थानकातून अनेक चोरीच्या घटना घडतात. बसमध्ये चढत असतांना एका महिलेच्या पर्सची चैन उघडून २१ हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता घडली आहे.

याप्रकरणी सोमवारी ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनिषा दिनेश पाटील (वय ३५ रा. वाघ नगर, जळगाव) या आपल्या परिवारासह राहतात. २८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता त्या जळगाव येथील नवीन बसस्थानकात आलेल्या होत्या. त्यावेळी अमळनेर शिंदखेडा बस क्रमांक (एमएच १४ बीटी १३५१) या बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्सची चैन उघडून त्यातून २१ हजार रूपयांची रोकड काढून चोरी केली.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला मात्र काही उपयोग झाला नाही. अखेर त्यांनी सोमवारी ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ रविंद्र ठाकरे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.