जळगाव पुन्हा हादरले.. मेहरूण तलावाजवळ एकाचा निर्घृण खून

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव खुनाच्या घटनेमुळे पुन्हा हादरले आहे. मेहरूण तलावाच्या काठावर अतिशय क्रूर पध्दतीत खून झाल्याची घटना दुपारी उघडकीस आली आहे.

जळगाव शहरातील मेहरूण तलावाच्या काठावर एका प्रौढाचा मृतदेह आढळून आला आहे. या व्यक्तीचे वय साधारणपणे पन्नासच्या सुमारास असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. सदर मृतदेहाचा चेहरा हा दगडाने ठेचल्याचा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन प्राथमिक चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणी पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.