जळगाव शहर पुन्हा हादरले.. तरुणाचा धारदार शस्त्राने खून

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तरुणाच्या हत्त्येने जळगाव शहर पुन्हा हादरले आहे. शहरातील शिवाजीनगर हुडकोजवळ ४० वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घेतना आज सोमवारी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास घडलीय. मोहम्मद मुसेफ शेख इसाक (वय४० रा. हुडको) असे मयताचे नाव असून खुनाचे कारण आणि मारेकरी अज्ञात आहे.

जळगाव शहरात गेल्याच आठवड्यात दोन हत्त्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनेला काही दिवस उलट नाही तोवर आज सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास बर्फ फॅक्टरी गवळीवाडाजवळ मोहम्मद मुसेफ शेख इसाफ या तरुणाचा खून केल्याचे उघडकीस आले आहे.

मुसेफ हा हुडको परिसरात राहून हमाली काम करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित होता. गेल्या वर्षभरापासून तो रिकामाच असल्याने परिसरात फिरत असे.

सोमवारी मुसेफचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. नमाजसाठी नागरिक जात असताना घटना त्यांच्या लक्षात आली. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह पथक पोहचले आहे. मयताजवळ चॉपरचे कव्हर, एका शस्त्राची मूठ, रुमाल असे साहित्य पडले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.