Thursday, May 19, 2022

मनपाच्या प्रभाग समिती सभापतींची निवड घोषित

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

जळगाव महापालिकेच्या प्रभाग समितीच्या सभापती निवड प्रक्रिया जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण झाली असून चार प्रभाग समिती सभापतींची निवड जाहीर करण्यात आली.

- Advertisement -

शिवसेनेतर्फे एकही प्रभागाचे सभापतिपद न घेण्याची भूमिका जाहीर करण्यात आली, त्यामुळे चारही पदे विरोधकांना देण्यात आली. एक सभापतिपद भाजपला, एक एमआयएम व दोन बंडखोर गटाला देण्यात आले, त्यामुळे महापालिकेच्या चारही प्रभाग समितीच्या सभापतिपदाची निवड बिनविरोध झाल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. ही निवड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत अधिकृत घोषणा करण्यात आली.

प्रभाग समिती १ मधून खान रूखसाना बी बबलूखान, प्रभाग समिती २ मधून भाजपचे मुकुंदा सोनवणे, प्रभाग समिती ३ मधून सुन्नाबी राजू देशमुख आणि प्रभाग समिती ४ मधून पार्वताबाई भिल यांची निवड घोषील करण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, महापालिका आयुक्त सतिश कुळकर्णी आदी उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या