Sunday, November 27, 2022

आश्रमशाळांचे सर्व प्रश्न येत्या दोन वर्षात मार्गी लावणार- डॉ.विजयकुमार गावित

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे दिनांक 23 रोजी एकात्मिक आदिवासी विकास विभाग यावल, प्रकल्प अंतर्गत आदर्श कर्मचारी पुरस्कार वितरण तसेच योग शिबिराची सांगता कार्यक्रम घेण्यात आला.

- Advertisement -

- Advertisement -

कार्यक्रमासाठी जळगाव लोकसभा खासदार उन्मेशदादा पाटील अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर आदिवासी मंत्री डॉ. विजयकुमार गावित, खासदार रक्षाताई खडसे, आमदार लताताई सोनवणे, आमदार शिरीषदादा चौधरी, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी, आयुक्त हिरालाल सोनवणे, अप्पर आयुक्त संदीप गोलाईत, प्रकल्पाधिकारी विनिता सोनवणे उपस्थित होते. शासकीय तसेच अनुदानित आश्रमशाळातील आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक, आदर्श अधीक्षक, आदर्श शिक्षकेतर कर्मचारी तसेच वसतीगृहाचे गृहपाल यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांचा यावेळी गौरव करण्यात आला. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी येत्या काळात आकृतीबंधानुसार आश्रमशाळांसाठी सर्व प्रकारची भरती प्रक्रिया राबवून आश्रमशाळांना कला, संगीत, क्रीडा शिक्षक यांची नेमणूक करण्यात येईल असे आश्वासन दिले. ते पुढे म्हणाले विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व असून मी देखील उत्तम खेळाडू होतो आणि त्याचा फायदा मला माझ्या राजकीय जीवनात झाला या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आश्रमशाळेतून निर्माण व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखविली.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जागेत मुला-मुलींचे स्वतंत्र वस्तीगृह, जिल्ह्यामध्ये एकलव्य निवासी शाळा उभारण्याचा मानस असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. याचा फायदा येत्या काळामध्ये स्पर्धा परीक्षेतून पुढे येणाऱ्या आदिवासी बालकांना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावर प्रकल्प कार्यालयाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी योग शिबिराचे आयोजन केले. त्याला विद्यापीठाने उत्तमरीत्या संचालित केले याबद्दल त्यांनी यावल प्रकल्पाच्या प्रकल्पाधिकारी विनिता सोनवणे यांच्या कार्याचा गौरव केला.

यावेळी सहाय्यक प्रकल्पाधिकारी पवन पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी एम. आर. सुलताने तसेच इतर कार्यालयीन कर्मचारी, वसतिगृह कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी आश्रमशाळा संस्थाचालक, विविध संघटनांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या