Friday, December 9, 2022

महाजनांना झटका; जिल्‍हा दूध संघावर खडसे राज कायम

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जळगाव जिल्‍हा दूध संघात (Jalgaon Jilha Dudh Sangh) बसलेल्‍या प्रशासक मंडळ औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench) अवैध ठरविले असून मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना चांगलाच झटका बसला आहे.

- Advertisement -

मात्र राष्‍ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांना दिलासा मिळाला आहे. खडसेंच्या नेतृत्वाखाली असलेले संचालक मंडळ कायम ठेवण्याचे आदेश दिले. यामुळे जिल्हा दूध संघावर आता एकनाथराव खडसे यांचं राज कायम असणार आहे.

- Advertisement -

एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हा दूध संघावर संचालक मंडळ कार्यरत होते. खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे अध्यक्षा आहेत. राज्यात मोठा सत्तासंघर्ष होवून शिंदे- फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Govt) आल्यानंतर या नव्या सरकारने जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करत भाजपचे आमदार मंगेश चव्हाण (BJP MLA Mangesh Chavan) यांच्या मुख्य प्रशासकीय नेतृत्वाखाली प्रशासक मंडळ नियुक्त केले होते.

दरम्यान शासनाच्या या निर्णयाविरूध्द संचालक मंडळाने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर आज निर्णय झाला असून न्यायालयाने जिल्हा दूध संघावरील प्रशासक मंडळ अवैध ठरविले आहे. संचालक मंडळाला पुन्हा अधिकार बहाल केले असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या